Rajesh Tope | ‘बुस्टर डोसचा खर्च केंद्राने उचलावा’-

| Updated on: Jun 14, 2022 | 1:01 AM

प्रायव्हेट हॉस्पिटलमधील मर्यादित क्षमता पाहता सर्वदूर बूस्टर डोस उपलब्ध करून दिले, त्याचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे बूस्टर डोसचा 380 रुपयांचा दर पाहता नागरिक विचारणा करतात. त्यामुळे तो मोफत करावा अशी मागणी त्यांनी केलीय.

Follow us on

YouTube video player

जालना : कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोफत करावा, त्याचा खर्च केंद्राने उचलावा अशा प्रकारची मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलीय. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये राजेश टोपे यांनी केंद्राकडे ही विनंती केली आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमधील मर्यादित क्षमता पाहता सर्वदूर बूस्टर डोस उपलब्ध करून दिले, त्याचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे बूस्टर डोसचा 380 रुपयांचा दर पाहता नागरिक विचारणा करतात. त्यामुळे तो मोफत करावा अशी मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, लसीकरण मोहीम राबवणाऱ्या आशा वर्करला केंद्राकडून 2000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची देखील मागणी केल्याचे त्यांनी सांगितलं.