Rajesh Tope On PM Narendra Modi : ‘रुग्णालयात आग लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली-

| Updated on: Apr 27, 2022 | 8:40 PM

सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच मेंटेनन्सच्या बाबतीतल्याही सूचना दिल्या आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत टोपे यांनी दिली.

Follow us on

मुंबई : आज पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांनी देशातील कोरानाच्या सद्य स्थितीवर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) ही सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनासंदर्भात (Corona Update) पुन्हा काही सूचना करण्यात आल्या. तसेच त्यांनी राज्याला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या. तसेच देशात रूग्णालयातील आगीच्या घटना होत असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यासंदर्भात काळजी घ्यावी आणि सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तसेच आता राज्य शासन अलर्ट मोडवर आल्याने पुन्हा रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांना फायर ऑडिट करण्यास सूचना दिल्या आहेत. तसेच मेंटेनन्सच्या बाबतीतल्याही सूचना दिल्या आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत टोपे यांनी दिली.