Sanjay Gaikwad : आमदार साहेब जरा इकडे पण लक्ष द्या, बुलढाणा मतदारसंघातील रुग्णालयात साचली घाण!
बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल आमदार निवासमधील कर्मचाऱ्याला निकृष्ट अन्नावरुन मारहाण केली. या प्रकाराची सध्या राज्यभर चर्चा होत असताना त्यांच्याच बुलढाणा मतदारसंघातील एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
गणेश सोलंकी, बुलढाणा
आमदार संजय गायकवाड साहेब आपण उपहारगृहात ‘उत्कृष्ट’ डाळीसाठी झगडत असताना, तुमच्याच मतदारसंघातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मात्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, रुग्णांसाठी जेथे जेवण बनवले जाते, त्या स्वयंपाकघराला लागूनच ही घाण साचली आहे. आपण चांगल्या जेवणासाठी म्हणजेच आपल्या वैयक्तिक सोयीसाठी आणि खाण्याच्या दर्जासाठी इतके आग्रही आहेत की त्यासाठी तुम्ही कर्मचाऱ्याला मारहाण करता. दुसरीकडे, ज्या रुग्णांनी तुम्हाला निवडून दिले त्याचं आरोग्य मात्र धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वत्र घाण पसरलीय बाजूला भिंतीला लागून नर्सिंग कॉलेजचे हॉस्टेल आहे. दोन मिनिट याठिकाणी उभे राहू शकत नाही. अशी परिस्थिती सामान्य रुग्णालयाची आहे, त्यामुळे आमदार साहेब जरा याकडे ही लक्ष द्या, अशी म्हणायची वेळ आली आहे.
Published on: Jul 10, 2025 05:08 PM
