Varun Sardesai : गोऱ्हेंच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागताच वरूण सरदेसाई भडकले; म्हणाले, इथं काय अतिरेकी….
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाई यांनी आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षारक्षकावर चांगलेच संतापले.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षारक्षकाचा धक्का लागल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. इथे काय अतिरेकी घुसलेत.. दुसऱ्यांदा धक्का लागला असं म्हणत वरूण सरदेसाई यांनी सवाल उपस्थित केलेत. यावेळी मुद्दामून धक्का लागलेला नाही नम्रपणे सांगते तरीही तुम्ही ओरडताय असं नीलम गोऱ्हे म्हणाल्यात .पुढे त्या असंही म्हणाल्या की ही खेकसण्याची कुठली तुमची संस्कृती असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सरदेसाई यांच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न केलाय. बघा व्हिडीओ नेमकं काय घडलं?
Published on: Jul 10, 2025 10:43 PM
