Kolhapur Rain | पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात

Kolhapur Rain | पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात

| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 8:39 AM

पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात. सांगली जिल्ह्यातील अनेक पूल आणि 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्री 100 हून अधिक नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर सुरू केले असून रात्री 11 पर्यंत अनेक कुटुंबांनी आपले स्थलांतर केले आहे.

पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. कृष्णेचे पात्र हे इशारा पातळीकडे जात आहे. यामुळे या भागातील काही कुटुंबाचे रात्री तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे.तर शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक पूल आणि 7 बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रात्री 100 हून अधिक नागरिकांनी स्वतःहून स्थलांतर सुरू केले असून रात्री 11 पर्यंत अनेक कुटुंबांनी आपले स्थलांतर केले आहे. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोडवर पाणीच पाणी झआलं आहे. अनेकांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत.

Published on: Jul 23, 2021 08:39 AM