Maharashtra Rain Alert :  बळीराजाला पुन्हा धडकी, राज्यात पावसाचा जोर वाढला, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Maharashtra Rain Alert : बळीराजाला पुन्हा धडकी, राज्यात पावसाचा जोर वाढला, ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

| Updated on: Sep 27, 2025 | 12:59 PM

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, लातूर आणि सोलापूरला रेड अलर्ट असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जालना, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्रीपासूनच या भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती.

सोलापूर जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसला असून, पुढील दोन दिवसांसाठी सोलापूरला रेड अलर्ट देण्यात आला आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यांच्या हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले असून, शेतात आणि घरातही पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा उघडीप दिली असली, तरी आज पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Published on: Sep 27, 2025 11:40 AM