पोलीसांनीच केले कायद्याचं उल्लंघन, चंदा अन् दीपक कोचर प्रकरणी न्यायालयाचे ताशेरे

| Updated on: Jan 09, 2023 | 1:32 PM

आज पार पडलेल्या सुनावणीत ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय.

Follow us on

मुंबई : ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना नियमबाह्य कर्ज वाटपाप्रकरणी अनेक अडचणींचा सामाना करवा लागत आहे. व्हिडिओकॉनला दिलेल्या हजारो कोटींच्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या शेल कंपन्यांमधून 64 कोटी रुपये वळवण्यात आले.

वर्ष 2009 ते 2011 दरम्यान बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 1 हजार 735 कोटींचं कर्ज दिलं आहे. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक झाली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.

आज पार पडलेल्या सुनावणीत ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. तसेच या प्रकरणावरून न्यायालयाने पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ताशोरे ओढले आहेत.

कोचर दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी.के. चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटले केले की, कोचर दाम्पत्याची अटक फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 14 अ चे उल्लंघन करून करण्यात आली. या कलमात असे नमूद केले आहे की पोलीस अधिकाऱ्याने अटक करण्यापूर्वी नोटीस पाठवणे आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने दोघांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले.