Cloudburst: हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी.. नद्यांना मोठा पूर अन् डोंगरातील झाडं, दगडं रस्त्यावर; बघा VIDEO

Cloudburst: हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटी.. नद्यांना मोठा पूर अन् डोंगरातील झाडं, दगडं रस्त्यावर; बघा VIDEO

| Updated on: Jun 26, 2025 | 3:36 PM

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर सध्या पाहायला मिळतोय. कुल्लू आणि मनाळीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे.

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. अचानक झालेल्या मोठ्या पावसानं नद्यांना पूर आलाय. ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं डोंगरातील झाडं दगड ही वाहून रस्त्यावर आली आहेत. पाण्यासोबत वाहून आलेल्या लाकडांमुळे जंगलात वृक्षतोड झाल्याचं समोर आलय. धर्मशालामध्ये झालेल्या ढगफुटीमुळे 20 कामगार वाहून गेले. त्यातील दोघांचे मृत्यू झाले आहेत. मुसळधार पावसामुळे लुंगटा पॉवर प्रोजेक्टजवळ रस्ता खचला. जोरदार पावसामुळे कुल्लू मनाळीमध्ये नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. पाण्याच्या प्रवाहामुळे नद्यांमधील मोठे दगड मनाळी-लेह मार्गावर आले आहेत. पाणीपातळी वाढल्यामुळे एक गाडी देखील वाहून गेली आहे. कुल्लूमध्ये आलेल्या पुरामूळे वीज प्रकल्पाला मोठं नुकसान झालाय. नदीकाठावर असलेल्या वीज प्रकल्पाचा शेड पाण्यात वाहून गेलाय. तर अग्निशमन दलाची गाडी देखील चिखलात अडकली. हिमाचलच्या मंडीमध्ये देखील ढगफुटी झाली आहे. ढगफुटीनंतर व्यास नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांच्या चिंतेंत वाढ झाली आहे.

Published on: Jun 26, 2025 03:29 PM