Assam CM vs Gaurav Gogoi : गोगोईंचा पाक दौरा आयएसआयच्या निमंत्रणवरून; हिमंता बिस्वा सरमांचा आरोप

Assam CM vs Gaurav Gogoi : गोगोईंचा पाक दौरा आयएसआयच्या निमंत्रणवरून; हिमंता बिस्वा सरमांचा आरोप

| Updated on: May 19, 2025 | 4:22 PM

Himanta Biswa Sarma allegations Gaurav Gogoi : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगाई यांच्या पाकिस्तान दौऱ्यावरून टीका करत गंभीर आरोप केलेले आहेत.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आरोप केलेले आहेत. ते आयएसआयच्या आवाहनावरून पाकिस्तानला गेले होते. त्यांनी पाकिस्तान संघटनेसोबत जवळून काम केले. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. आम्ही लवकरच सर्व पुरावे सादर करू, असंही हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हंटलं आहे.

आयएसआयच्या निमंत्रणावरून गौरव गोगाईंचा पाकिस्तान दौरा होत असल्याचं हिमंता बिस्व सरमा यांनी म्हंटलं आहे. गोगोईना पाकिस्तान मंत्रालयाकडून थेट निमंत्रण आलेलं आहे, असंही हिमंता बिस्व सरमा यांनी म्हंटलं आहे. मात्र गौरव गोगाईंनी सारमा यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. तसंच आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मानसिक आरोग्य ठीक नाही आहे, असंही गोगोई यांनी म्हंटलं. हिमंता बिस्व सरमा यांचे आरोप कधीही सिद्ध झाले नाही.

Published on: May 19, 2025 04:22 PM