Kalyan D-Mart : मराठी माणूस कचरा, आमच्या जीवावर तुम्ही… अमराठी महिलेचा D-Mart मध्ये गोंधळ, नेमका वाद कशावरून?
कल्याण पश्चिमेतील डी-मार्टमध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एका महिलेने कर्मचाऱ्याला हिंदीत बोलण्याचा आग्रह केला, मात्र त्याने मराठीत बोलण्यावर ठाम राहिला. त्यानंतर महिलेने मराठी भाषा आणि महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरल्याचे सांगण्यात आले, ज्यामुळे वाद अधिकच वाढला.
कल्याणमध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद झाल्याचा दावा केला जात आहे. कल्याण पश्चिमेतील एका डी-मार्ट स्टोअरमध्ये ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. एका महिलेने स्टोअरमधील कर्मचाऱ्याला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह केला. मात्र, त्या कर्मचाऱ्याने आपण मराठी असून मराठीतच बोलणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. कर्मचाऱ्याने हिंदीत बोलण्यास नकार दिल्याने महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.
या वादादरम्यान, महिलेने मराठी भाषेबद्दल आणि महाराष्ट्राविषयी अपशब्द वापरले, तसेच मराठी माणूस कचरा आहे, आमच्या जीवावर मराठी माणूस जगतो असे आक्षेपार्ह उद्गार काढल्याचाही प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे. त्यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने हस्तक्षेप करत महिलेला असे न बोलण्यास सांगितले आणि तिला मराठी शिकण्याचा सल्ला दिला. आम्ही महाराष्ट्रात आहोत, मराठीच बोलणार असे प्रत्यक्षदर्शीने महिलेला सुनावले. यानंतर महिला प्रत्यक्षदर्शीवर दोनदा अंगावर धावून आल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेमुळे भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
