Honey Trap : राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात? पुरावे हाती लागू नये म्हणून अनेकांनी…

Honey Trap : राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात? पुरावे हाती लागू नये म्हणून अनेकांनी…

| Updated on: Jul 16, 2025 | 12:15 PM

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान हा गौप्यस्फोट केला जात होता. आता या प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. काय आहे नवं अपडेट?

चंदन पुजाधिकारी, नाशिक

राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरु असल्याची माहिती मिळतेय. नाशिकचे काही वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरात गुप्त तपास सुरू असून राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर खळबळ उडाली आहे. तर हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या काही संशयित अधिकाऱ्यांनी तातडीने आपले मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, या प्रकरणात अडकलेले काही अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनी आपले संबंध लपवण्यासाठी परस्परांमध्ये समन्वय साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात संशयित व्यक्तींचे व्हिडिओ कॉल्स, हॉटेलमधील भेटी आणि मोठे आर्थिक व्यवहार यांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Published on: Jul 16, 2025 12:15 PM