दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर काँग्रेस स्वबळावर लढेल, विजय वडेट्टीवार यांचे स्पष्टीकरण
काँग्रसने वंचित सोबत बोलणी सुरुच ठेवली आहे. आज आणि उद्याचा वेळ आहे. समविचारी पक्षांसोबत युती करण्यासाठी आम्ही दारे उघडी ठवेली आहेत असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी युती करण्याचे आदेश आहेत. वंचित सोबत चर्चा सुरु आहे. आज आणि नाही तर उद्या यावर निर्णय होईल. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात लक्षात प्रत्येकाने दोन पावले मागे घ्यावेत असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घड्याळावरुन लढायचे की तुतारी असा वाद सुरु असल्याचे कळते. परंतू त्यांच्या घरात आम्ही डोकावत नाहीत. परंतू ते जर एकत्र आले तर पुण्यात काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. राज्यात कोणचा पायपोस कोणात नाही. इतक्या आघाड्या आणि युत्या होत आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. जनता हे सर्व पाहात आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 27, 2025 01:51 PM
