नाईक साहेबांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं – दीपा चव्हाण

| Updated on: Apr 21, 2022 | 5:23 PM

भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात (Thane District Court) पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय.

Follow us on

ठाणे : भाजप नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावरील दाखल गुन्हा प्रकरणाची सुनावणी गुरुवारी ठाणे सत्र न्यायालयात (Thane District Court) पार पडली. यावेळी तपास अधिकारी यांचा जबाब घेतल्याशिवाय कुठलीही ऑर्डर देणार नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तसंच या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 27 तारखेला होणार आहे. दरम्यान, गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलंय. नाईकसाहेब यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं. माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं. माझ्या जीवालाही धोका होऊ शकतो. त्यामुळे मला लोकांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारकडून मला चांगलं सहकार्य मिळत असल्याचं ही चव्हाण यांनी सांगितलं.