Monsoon 2025 Update : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार

Monsoon 2025 Update : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार

| Updated on: May 11, 2025 | 1:42 PM

IMD monsoon forecast : देशात नैऋत्य मोसमी पाऊस यंदा वेळेत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदा नैऋत्य मोसमी पाऊस देशात वेळेत दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी 27 मे रोजी केरळामध्ये येणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. दरवर्षी केरळमध्ये मान्सून १ जून दाखल होत असतो. आयएमडीच्या अंदाजानुसार, यावर्षी मान्सून 23 मे ते 31 मेदरम्यान येऊ शकतो.

दरम्यान, अंदमान निकोबारमध्ये गेल्या वर्षी 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. तर केरळमध्ये 30 मे रोजी दाखल झाला होता. परंतु यंदा 27 मे रोजीच मान्सून दाखल होईल. यंदा देशभरात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबरमध्ये  105 टक्के पावसाचा अंदाज आहे.

Published on: May 11, 2025 01:42 PM