Unseasonal Rain : गारपीट अन् अवकाळीनं महाराष्ट्राला झोडपलं, बळीराजा हवालदिल; कोणत्या जिल्ह्यांना तडाखा?
राज्यभराच अवकाळीचा तडाखा पाहायला मिळत आहो. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नंदुरबारच्या गंगापूर परिसरात तुफान गारपीट झाली तर नाशिकलाही अवकाळीने झोडपले असून अनेक भागात गारपीट झाली आहे.
कोकण, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे. नंदुरबार, नाशिक, अहिलेनगर, नागपूर, वर्धा, धुळे, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्यामधल्या गंगापूर परिसरात गारपीटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांसह चाऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. नंदुरबार तालुक्यामधल्या पश्चिम पट्ट्यामधिल गंगापूर, ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय.
नाशिकलाही अवकाळीनाच झोळपलं. शिंदेखेड, मार सांगवी, शिलापूर भागांत गारपीट झाली. नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. गारपीट झाल्याने वर्षभर काम केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडावर निराशा आणण्याचं काम केलेलं आहे. तर रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरमधील कळमाना APMC मार्केटमध्ये हजारो पोती धान्य भिजलंय. अहिल्यानगर शहरासह परिसरातील अवकाळी पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात पपईच्या बागा उध्वस्त झाल्या. वादळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातही पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेली रब्बी पिक जमीनदोस्त झाली आहे.
