Pakistan Army : पाकिस्तानात एकच बवाल… पाक लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

Pakistan Army : पाकिस्तानात एकच बवाल… पाक लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

| Updated on: May 02, 2025 | 7:10 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान घाबरला आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये एक नवीन गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे समर्थक सोशल मीडियावर खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. इमरान खानचे समर्थक पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या राजीनाम्याची मागणीही करत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकचा तणावर चांगलाच शिगेला पोहोचला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये इमरान खानच्या सुटकेची मागणी जोर धरत आहे. इमरान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इस्लामचे कार्यकर्ते आणि समर्थक खान यांच्या सुटकेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना पदावरून हटवण्यासंदर्भात सोशल मीडियावर जोरदार मोहीम राबवली जात आहे. तर तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांना सोडण्यासाठी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारवर दबाव वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तान भीतीच्या छायेत वावरत असताना दिसत असून भारताकडून युद्ध करण्यात येईल, अशी धास्ती देखील त्यांच्या मनात आहे. दरम्यान,  भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या पाया खालची जमीन हादरली आहे. त्यामुळे पाकची परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे दिसतेय.

Published on: May 02, 2025 07:10 PM