Imtiaz Jaleel : MIM येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार अन् तशी तयारी… BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य

Imtiaz Jaleel : MIM येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार अन् तशी तयारी… BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 15, 2025 | 6:20 PM

गुरुवारी पक्षाच्या बैठकीनंतर एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचा आम्ही निषेध करतो. तुर्की आणि अझरबैजान पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत याबद्दल ते म्हणाले की, जेव्हा युद्ध होते तेव्हा प्रत्येक देश त्यांच्या सक्ती किंवा धोरणांनुसार एका किंवा दुसऱ्या बाजूचे समर्थन करतो हे स्वाभाविक आहे.

एमआयएम येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार असल्याचं मोठं वक्तव्य माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केलं.  नुकतीच एमआयएमची एक बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इम्तियाज जलील म्हणाले, आम्ही लवकरच सदस्यता मोहीम राबवणार आहोत. फक्त महानगर पालिकाच नाही तर सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जाणार आहेत. भाजपची सोशल मीडिया टीम पैशाने कोणतीही बातमी पसरवते. पण एमआयएमची मजबूत सोशल मीडिया टीम तयार केली जाईल. राष्ट्रीय प्रवक्त्याचीही नियुक्ती केली जाईल, असे जलील यांनी सांगितले. तर युतीच्या बाबतीत जिल्हास्तरीय नेत्यांना जबाबदारी दिली जाईल. एमआयएमकडून अनेक मोठ्या बैठका आयोजित केल्या जातील ज्यामध्ये असुद्दीन ओवौसी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

इम्तियाज जलील असेही म्हणाले की, बीएमसी निवडणुका काही ना काही कारणास्तव पुढे ढकलल्या जात आहेत. पण न्यायालयाने आता या निवडणुकी चार महिन्यात घेण्याचे आदेश दिले आहेत तर आमची तयारी तशीच सुरू आहे. कारण आमच्या पक्षाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून झाली होती. यावेळीही आमची तयारी जोमाने सुरू आहे. यावर चर्चा करण्यासाठी आपण आज भेटलो आहोत. कुठे आणि किती जागा लढवता येतील यावर सविस्तर चर्चा होईल.

Published on: May 15, 2025 06:20 PM