Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांचा हल्ला! तिकीट वाटपावरून वाद की… संभाजीनगरात घडलं काय?

| Updated on: Jan 08, 2026 | 11:38 AM

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर तिकीट नाकारल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला. जलील यांनी मंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर हल्लेखोरांना संरक्षण दिल्याचा आरोप केला. तर काँग्रेसच्या उमेदवाराने जलील यांच्यावर तिकीट विकल्याचा आरोप करत प्रत्युत्तर दिले.

छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर त्यांच्याच पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला. आगामी निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी ही कृती केली. जलील यांची प्रचार रॅली बायजीपुरा भागातून जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करत जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या एका समर्थकाला मारहाण केली. ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याचे जलील यांनी सांगितले.

या हल्ल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हल्लेखोरांना त्यांचे संरक्षण असल्याचा दावा जलील यांनी केला. दुसरीकडे, काँग्रेसचे स्थानिक उमेदवार कलीम कुरेशी यांनी जलील यांचे आरोप फेटाळत, उलट जलील यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा दावा केला. यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे कुरेशी म्हणाले. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Published on: Jan 08, 2026 11:36 AM