Imtiaz Jaleel : ‘एमआयएम’चे जलील ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर
Imtiaz Jaleel Meeting With Udhav Thackeray : एमआयएमचे नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले आहेत. या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
एमआयएमचे नेते आणि संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील आज उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले आहेत. जलील सध्या मातोश्रीवर दाखल झालेले असून आता ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या भेटी मागचं कारण नेमकं काय आहे ते अद्यापही समजलेलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच ईदच्या अनुषंगाने संभाजीनगरमध्ये नेते इम्तियाज जलील यांच्या घरी शिवसेना उबठा गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात बराच वेळ चर्चा देखील झाली होती आणि आता त्यानंतर इम्तियाज जलील हे मुंबईत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहे. या भेटीचं कारण काय? त्यांच्यात काय राजकीय चर्चा होणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Published on: Apr 11, 2025 01:15 PM
