Special Report | आर्थर जेलमध्ये राऊतांची ओळख कैदी नं. 8959

| Updated on: Aug 14, 2022 | 12:12 AM

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात, ईडीच्या कारवाईनंतर कोर्टानं त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. त्यामुळं संजय राऊत याच आर्थर रोड जेलमध्ये आहेत...आणि जेलच्या नियमाप्रमाणं त्यांना 8959 असा कैदी नंबर मिळालाय

Follow us on

मुंबई : कैदी नंबर, 8959…आर्थर रोड जेलमध्ये गेलेल्या राऊतांना (Sanjay Raut)हाच नंबर मिळालाय. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक अशी राऊतांची ओळख असली तरी आर्थर रोड जेलमध्ये त्यांची ओळख कैदी नंबर 8959 अशी आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात, ईडीच्या कारवाईनंतर कोर्टानं त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय. त्यामुळं संजय राऊत याच आर्थर रोड जेलमध्ये आहेत…आणि जेलच्या नियमाप्रमाणं त्यांना 8959 असा कैदी नंबर मिळालाय.

संजय राऊतांना सुरक्षेच्या कारणास्तव 10 बाय 10 च्या स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आलंय. राऊत जेलमध्ये लिखाण आणि वाचन करुन आपला वेळ घालवतात. जेल प्रशासनानं त्यांच्या मागणीनुसार वही आणि पेन दिलाय. जेलमधील ग्रंथालयातील पुस्तकंही त्यांनी वाचायला घेतलीत. विशेष म्हणजे राऊतांना त्यांच्या बराकमध्ये टीव्ही सुद्धा आहे. त्यामुळं सध्याच्या घडामोडी बातम्यांवर त्यांची नजर आहे
इतर कैद्यांप्रमाणं संजय राऊतांना कॅरम सुद्धा देण्यात आलाय. कोर्टाच्या आदेशाप्रमाणं राऊतांना घरचं जेवण आणि औषधीही मिळतायत  सध्या जेलमध्ये असलेल्यांना घरुन मनी ऑडरही घेण्याचीही परवानगी आहे. त्यानुसार संजय राऊतंना महिन्याला घरुन 6 हजार मागवता येणार आहेत. मनी ऑर्डरच्या माध्यमातून आता कैद्यांना 6 हजार मिळू शकतात. 6 हजारांच्या माध्यमातून ते कॅन्टीनमधून हवं ते घेऊ शकतात
आधी ही मर्यादा साडेचार हजार रुपये इतकी होती आता ती वाढवून 6 हजार करण्यात आली.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीनं कारवाई केल्यापासूनच राऊतांनी आरोप फेटाळलेत. मात्र राऊतांनी प्रत्यक्ष फायदा मिळवल्याचा आरोप ईडीचा आहे…तर शिंदे गटाचे आमदार केसरकरांमुळंच राऊतांना जेलमध्ये जावं लागलं आणि कोठडी वाढली असा आरोप राऊतांचे भाऊ सुनिल राऊतांनी केलाय.

दुसरीकडे राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरेंनीही राऊतांना टोला लगावलाय. माध्यमांशी फार बोलत नाही, असा सवाल अमित ठाकरेंना करण्यात आला. त्यावर मी राऊतांचा रिप्लेसमेंट नाही, असं म्हणत अमित ठाकरेंनी चिमटा काढला.

महाविकास आघाडीचे 3 नेते सध्या आर्थर जेलमध्ये आहेत.अनिल देशमुख आणि नवाब मलिकही मनीलाँड्रिंग प्रकरणात आर्थर रोड जेलमध्येच आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांपैकी सर्वात आधी अनिल देशमुखच या जेलमध्ये गेले

गेल्या 9 महिन्यांपासून देशमुखांना जामीन मिळालेला नाही. देशमुखांना आर्थर जेलमध्ये घरचं जेवण मिळत नाही. कैद्यांना जे जेवण मिळतं तेच जेवण देशमुखांना दिलं जातं. कोर्टाच्या परवानगीनुसार देशमुखांना बेड देण्यात आलाय. देशमुखही स्वतंत्र बराकमध्येच आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशमुखांना टीव्ही, कॅरम दिला असून अधिक वेळ बातम्याच पाहतात

डी गँगशी संबंधित मनी लाँड्रिंग कनेक्शन प्रकरणात नवाब मलिकांचाही मुक्काम आर्थर जेलमध्येच आहे. मलिकांनाही 6 महिन्यांपासून जामीन मिळालेला नाही. मात्र मलिकांची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टाच्या परवानगीनं ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2 महिन्यांपासून मलिकांवर कुर्लातल्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जेलमध्ये मलिकांना बेड आणि खुर्ची मिळालीय कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना घरचं जेवण देण्याचीही परवानगी मिळाली. मलिकांसाठी आर्थर जेलमध्ये स्वतंत्र बराक असून टीव्ही, कॅरम आणि पुस्तकं देण्यात आलीत

आर्थर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख असो मलिक की आता राऊत, जामिनासाठी कसून प्रयत्न करतायत..पण अजूनही तरी त्यांना जामीन मिळालेला नाही.