Raj Thackeray Live | ‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’ : राज ठाकरे

Raj Thackeray Live | ‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’ : राज ठाकरे

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 5:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचं लेखन वाचण्याचा सल्ला देण्यात आला. राष्ट्रवादीच्या या सल्ल्यानंतर आता राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.