India Vs Pakistan : पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!

India Vs Pakistan : पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!

| Updated on: May 08, 2025 | 7:51 PM

pakistani screening bans in india : देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे. हा आदेश सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लागू होईल. त्यामुळे पाकिस्तानला हा आणखी एक दणका भारताने दिला आहे.

हा आदेश माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ अंतर्गत जारी करण्यात आला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की पाकिस्तानशी संबंधित कोणताही मजकूर प्रसारित केल्याने देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला आणि परदेशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना भारतात असा कोणताही कंटेंट दाखवणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Published on: May 08, 2025 07:51 PM