अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांचा खरेदी करार; नौदलाची ताकद लक्षणीय रित्या वाढली

अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांचा खरेदी करार; नौदलाची ताकद लक्षणीय रित्या वाढली

| Updated on: Apr 28, 2025 | 3:39 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू असतानाच आता भारताने 26 सागरी लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीसाठी फ्रांससोबत करार केलेला आहे.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या २६ राफेल नौदल लढाऊ विमानांसाठी भारत आणि फ्रान्सने ६३,००० कोटी रुपयांचा करार केला आहे. दिल्लीत भारत आणि फ्रांसमध्ये एका महत्वाच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी झाली आहे. दोन्ही देशांनी 26 सागरी लढाऊ राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63 हजार कोटी रुपयांचा करार केला. या कारारामुळे भारतीय नौदलाची ताकद लक्षणीय रित्या वाढणार आहे. नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या 62 वर पोहोचली आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आठवडा उलटायच्या आत भारताने फ्रांस सोबत हा करार केल्याने पाकिस्तानच्या मनात धडकी भरवणारा हा निर्णय म्हणावा लागणार आहे. ही सगळी 26 राफेल विमानं ही लढाऊ विमानं असणार आहेत. त्यामुळे वायुसेनेची ताकद यामुळे वाढली आहे.

Published on: Apr 28, 2025 03:39 PM