Pahalgam Terror Attack : हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी

Pahalgam Terror Attack : हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी

| Updated on: May 04, 2025 | 1:53 PM

India - Pakistan Conflict : हवा, पाणी आणि जमिनीवरून देखील आता भारताने पाकिस्तानला आवाहन दिलं आहे. येत्या 7 मे रोजी भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे.

भारताकडून 7 मे रोजी पाकिस्तानला एक ट्रेलर दाखवणार असून ‘है तयार हम’ असा इशारा देणार आहे. कर्नाटकच्या कारवार जवळ भारताकडून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात येणार आहे. हवा, पाणी आणि जमिनीवरूनही पाकिस्तानला याद्वारे घेरता येणार आहे.

येत्या 7 मे रोजी भारत क्षेपणास्त्र चाचणी करणार आहे. कर्नाटकच्या कारवार जवळ भारत ही मिसाईल चाचणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात भारताने ब्रम्होस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलची चाचणी केली. भारताच्या लढवू विमानांची काल उत्तर प्रदेशातल्या महामार्गावर यशस्वीपणे नाइट लॅंडींग झाली. उत्तर प्रदेशातल्या गंगा एक्सप्रेस वेवर हवाई दलाने आपली ताकद दाखवली. त्यामुळे हवा, पाणी आणि जमिनीवरून देखील आता भारताने पाकिस्तानला आवाहन दिलं आहे.

Published on: May 04, 2025 01:53 PM