Asia Cup Controversy : चोर पाकिस्तान ट्रॉफी घेऊन गेले, पाकच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास इंडियाचा नकार, BCCI ची ICC कडे तक्रार

Asia Cup Controversy : चोर पाकिस्तान ट्रॉफी घेऊन गेले, पाकच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास इंडियाचा नकार, BCCI ची ICC कडे तक्रार

| Updated on: Sep 30, 2025 | 10:25 AM

आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानचे मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी यांनी ती ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये निघून गेल्याने वाद निर्माण झाला. या प्रकारानंतर बीसीसीआयने आयसीसीकडे अधिकृत तक्रार नोंदवली असून, तातडीने ट्रॉफी परत करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानचा पाच विकेट्सने धुवा उडवत भारताने आशिया कप जिंकला. मात्र, सामन्यानंतर विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. भारतीय संघाने पाकिस्तानचे मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. मोहसीन नक्वी हे आशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष असून पाकिस्तानचे गृहमंत्रीही आहेत. भारताच्या विरोधात त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, याच कारणामुळे भारतीय संघाने त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. भारतीय खेळाडू अमिरात क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरोनी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला तयार होते, परंतु नक्वी यांनी यात अडथळा आणला. त्यांनी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन हॉटेलमध्ये निघून गेले. या घटनेनंतर मोठा गदारोळ माजला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहसीन नक्वी यांना तात्काळ ट्रॉफी परत करण्याची मागणी करत “लास्ट वॉर्निंग” दिली आहे. बीसीसीआयने या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलकडे (आयसीसी) अधिकृत तक्रार केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत या विषयावर जोरदार विरोध नोंदवण्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे.

Published on: Sep 30, 2025 10:25 AM