PM Modi CCS Meeting : पहलगाम हल्ल्यानंतर CCS ची दुसरी बैठक, ‘सिंधू जल’ स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पाकिस्तान हल्ल्या नंतर आज सीसीएसची दुसरी बैठक होणार आहे. या बैठकीत पाणी बंद नंतर आता कोणता मोठा निर्णय होतो का याकडे सर्वांच लक्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सीसीएसची ही बैठक होणार आहे.
पाकिस्तानच पाणी बंद केल्यानंतर आज पंतप्रधान मोदी सीसीएसची दुसरी बैठक घेणार आहेत. या बैठकीसह आज पंतप्रधान मोदी चार महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकांमध्ये राजकीय आर्थिक बैठकांचाही समावेश असणार आहे. सीसीएसच्या बैठकीत सुरक्षा संदर्भात बाबींवर विचारविनिमय होणार आहे. सिंधू करार स्थगित केल्यानंतर आतापर्यंतच्या घडामोडींवर बैठकीत मंथन होणार आहे. या बैठकीत पाकिस्तान विरोधात आणखी कोणता मोठा निर्णय होतो का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मोदींनी सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मोदींच्या बैठकी आधी राजनाथ सिंह यांनी काश्मीरवरून परतलेल्या सैन्य प्रमुखांसोबत बैठक घेतली होती. या बैठकांसोबतच मोदींनी आतापर्यंत १३ जागतिक नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. जागतिक स्तरावर पाकिस्तानला एकटा पाडण्यासाठी भारताची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळतंय त्यामुळे पाकच्या पायाखालची जमीन हादरली आहे.
