India Vs Pakistan : भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
India Vs Pakistan Updates : ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर आता रात्रीच्यावेळी सातत्याने हल्ला केला जात आहे. या सर्व हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख उत्तर दिलं जात आहे.
भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असून पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ले केले जात आहेट्. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावलेले आहेत. गुजरातच्या गांधीनगरमध्ये आपत्कालीन विभागाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. गुजरातच्या सुरक्षा मंत्र्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातो आहे.
दरम्यान, ज्या शहरांमध्ये पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत. किंवा हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सगळ्या शहरांमध्ये शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. शिवाय वाहतूक व्यवस्था देखील बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने रात्रीच्या वेळी हल्ले केले जात आहेट्. त्यामुळे रात्री सीमे जवळील शहरांना ब्लॅक आउट करून सुरक्षित राहण्यास सांगण्यात आलेलं आहे.
Published on: May 09, 2025 08:27 AM
