U19 world cup 2026 | अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष; कुटुंबाची प्रतिक्रिया काय?
कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा मोठा पराक्रम साधला आहे. या विजयानंतर आयुष म्हात्रे यांच्या कुटुंबात आणि परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आयुषच्या या यशाने संपूर्ण कुटुंब भावूक झाले असून, सर्वांनी मोठ्या आनंदाने हा क्षण साजरा केला आहे. दरम्यान, वसईच्या आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा बाजी मारल्यानंतर वसई-विरार परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषक 2026 मध्ये दणदणीत कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल 100 धावांनी मात करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला आहे. भारताने इंग्लंड संघाला 40.2 षटकांत 311 धावांवर सर्वबाद केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला.
कर्णधार आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा मोठा पराक्रम साधला आहे. या विजयानंतर आयुष म्हात्रे यांच्या कुटुंबात आणि परिसरात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आयुषच्या या यशाने संपूर्ण कुटुंब भावूक झाले असून, सर्वांनी मोठ्या आनंदाने हा क्षण साजरा केला आहे. दरम्यान, वसईच्या आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर 19 वर्ल्डकपमध्ये सहाव्यांदा बाजी मारल्यानंतर वसई-विरार परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विरारच्या बोळींज परिसरात आयुषच्या घरी आणि आजूबाजूच्या भागात उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. परिसरातील नागरिकांनी बँड-बाजासह नाचत आनंद साजरा केला. आयुषच्या घराबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून, चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे. आयुषच्या वडिलांनीही भावना व्यक्त करताना, “हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे,” असे सांगितले. एकूणच, अंडर १९ विश्वचषकातील या ऐतिहासिक विजयाने भारतासह वसई-विरार परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आयुष म्हात्रे हा युवा क्रिकेटपटू नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.