Pandharpur Wari | पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी आळंदीतील ज्ञानेश्वर मंदिरात तपासणी

| Updated on: Jun 30, 2021 | 12:23 PM

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे.

Follow us on

आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2 जुलैला सायंकाळी 4 वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. माऊलींच्या चलपादुका विशेष वाहनाने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मानाचा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलै 2021 रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार आहे. 1 जुलै 2021 ते 19 जुलै 2021 पर्यंत प्रस्थान सोहळा असेल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात राहणार आहेत. पहाटे 4 ते 5 सर्व देवांची महापूजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 12 सप्ताहाच्या काल्याचे किर्तन देवकर महाराज करतील. दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा कार्यक्रम असेल.