केंद्र सरकारच्या आदेशानं तपास यंत्रणाच्या कारवाया – संजय राऊत

केंद्र सरकारच्या आदेशानं तपास यंत्रणाच्या कारवाया – संजय राऊत

| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 10:35 AM

महाराष्ट्रातचं सगळ काही घडतंय असं म्हणून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे.

केंद्र सरकारमधील मधील काही मोजक्या लोकांच्यामुळे महाराष्ट्रात तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात सह पश्चिम बंगालमध्ये अधिक कारवाया होत असून हे सुडाच राजकारण सध्या देशात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवरती टीका केली होती. तसेच शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर सुध्दा आयकर विभागाचे छापे सुरू होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे अनेक नेत्यांनी बोलून दाखवलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात काही काम नाही, महाराष्ट्रातचं सगळ काही घडतंय असं म्हणून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे.