Jalgaon Gold Market :  पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी, किती रूपयांनी घसरले दर?

Jalgaon Gold Market : पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी, किती रूपयांनी घसरले दर?

| Updated on: Oct 22, 2025 | 11:04 PM

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर ४,५०० रुपयांनी, तर चांदीचे दर ५,००० रुपयांनी कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दर कमी झाल्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली असून, ग्राहकांनी आनंदाने खरेदी केली आहे.

पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याचे दर तब्बल ४,५०० रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरात ५,००० रुपयांची घट झाली. या भावघसरणीमुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, जळगावच्या सराफ बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

विशेषतः गृहिणींसाठी ही एक आनंदाची संधी ठरली आहे. अनेक महिलांनी या कमी दराचा फायदा घेत मनासारखी खरेदी केली आहे. काहींनी तर बजेटमध्ये बसून अपेक्षेपेक्षा जास्त दागिने खरेदी केल्याचे सांगितले. ग्राहकांनी हे दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून भविष्यात त्यांना अधिक खरेदी करता येईल. या घसरणीमुळे पाडव्याच्या सणाला खरेदीचा उत्साह आणखी वाढला आहे.

Published on: Oct 22, 2025 11:04 PM