Pahalgam Attack : वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, पहलगाममध्ये घडलं काय? चिमुकल्याने सांगितला थरार

Pahalgam Attack : वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, पहलगाममध्ये घडलं काय? चिमुकल्याने सांगितला थरार

| Updated on: Apr 24, 2025 | 4:03 PM

कलथिया आणि त्याचे कुटुंब 23 एप्रिल रोजी शैलेश कलथिया यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी काश्मीरला गेले होते. निसर्ग सौंदर्यात घोडेस्वारीचा आनंद लुटत असताना तिथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते सापडले. ज्यामध्ये शैलेश यांना गोळी घालून हत्या करण्यात आली.

पहलगाम येथे गुजरातमधील सुरत येथे राहणारं एक कुटुंब फिरण्यासाठी गेले होते. शैलेश कलथिया हे आपल्या पत्नी आणि मुलांसोबत पहलगाम येथे गेले होते. याचवेळी शैलेश यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये ही घटना घडली. त्याच्या दुसऱ्या दिवशी 23 एप्रिल रोजी शैलेश यांचा वाढदिवस होता. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी आणि मुलांसोबत शैलेश कलथिया यांनी मुंबईत आपला वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. मात्र वाढदिवसाच्या एक दिवस आधीच जम्मू-काश्मीरमध्ये पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शैलेश कलथिया यांचा जीव घेतला. सुरत येथील शैलेश कलथिया (43) यांच्यासाठी कौटुंबिक सुट्टी अतिशय वेदनादायी ठरली. काश्मीरच्या पहलगाममध्ये त्याच्या 44 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. मुंबईतील कांदिवली येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या विमा विभागात कर्मचारी असलेले कलथिया हे पत्नी शीतल, मुलगी नीती आणि मुलगा नक्ष यांच्यासह सुट्टीवर गेले होते. दरम्यान, या हल्ल्याचा थरारक अनुभव त्यांच्या लहानग्या मुलाने सांगितला आहे.

Published on: Apr 24, 2025 04:03 PM