Jammu Kashmir : दिसता क्षणी खात्मा… निशाण्यावरील 17 पैकी 6 जणं ठार, इतर दहशवादी रडारवर, सुरक्षा दलांकडून कसून शोध

Jammu Kashmir : दिसता क्षणी खात्मा… निशाण्यावरील 17 पैकी 6 जणं ठार, इतर दहशवादी रडारवर, सुरक्षा दलांकडून कसून शोध

| Updated on: May 17, 2025 | 4:38 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये, सैन्य दल दहशतवाद्यांवर तुटून पडले आहेत.  शोपियान आणि त्रालमध्ये आतापर्यंत ६ दहशतवादी मारले गेले आहेत. आणखी ११ दहशतवाद्यांना नरकात पाठवण्यास सैन्य दल तयार असून त्यांचा तपास सुरू आहे. 

काश्मीर खोऱ्यात ११ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांकडून कसून शोध सुरू असल्याची माहिती मिळतेय. निशाण्यावर असणाऱ्या १७ दहशतवाद्यांपैकी ६ जणांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. तर फरार असणाऱ्या ११ दहशतवाद्यांचा तपास सध्या सुरक्षा दलांकडून घेतला जात आहे. सुरक्षा दलाकडून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन किलरमध्ये जम्मू काश्मीरच्या त्राल मध्ये तीन तर शोपियानमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, आता ११ दहशतवादी सुरक्षा दलांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे त्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलाची मोहीम दिवस रात्र सुरू असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याने अवघ्या ४८ तासांत ६ स्थानिक दहशतवाद्यांना ठार मारले. तर, ११ दहशतवादी अजूनही सुरक्षा दलांच्या रडारवर आहेत. परंतु यापैकी ८ दहशतवादी असे आहेत ज्यांची नावे त्या १४ दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. या ११ जणांच्या यादीत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे, ज्यांचा सध्या शोध घेतला जात आहे.

Published on: May 17, 2025 04:36 PM