शिंदे गटाबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “40 आमदारांना परतीचे वेध…”
शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला.
मुंबई: शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी शिंदे गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला. अजित पवार यांच्याबाबतीत शिंदे गटातील काही लोकांची तक्रार होती. म्हणून त्यांनी सरकार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. आता अजित पवार यांच्या एन्ट्रीने जयंत पाटील यांनी शिंदे गटाला टार्गेट केलं आहे. ते म्हणाले की, “आज मला काळजी आहे की, उद्धव ठाकरेंचे 40 जण गेले त्यांची तक्रार काय होती.जी तक्रार होती तीच तिथे येवून बसली, त्या 40 आमदारांना आज परत फिरण्याचे वेध लागले आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे.”
Published on: Jul 06, 2023 09:46 AM
