Ajay Chowdhury Live | जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे गेलो : अजय चौधरी

Ajay Chowdhury Live | जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे गेलो : अजय चौधरी

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 11:19 AM

जितेंद्र आव्हाडांनी माझी दखल न घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे गेलो, असं शिवसेना आमदार अजय चौधरी म्हणाले. (Jitendra Awhad ignore me then Complaints Cm Uddhav thackeray Says MLA Ajay Chaudhary)

एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, इकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीत (Shiv Sena vs NCP) बिनसण्याचं चित्र आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका (Tata Cancer center) देण्याच्या गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांच्या तक्रारीनंतर आव्हाडांचा ड्रीम प्रोजेक्ट स्थगित झाला आहे.

कॅन्सरग्रस्तांसाठी इथे जागा दिली जात असली, तरी त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका आहे. त्याविरोधात स्थानिक महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडे पाठपुरावा केला. पत्रं लिहिली, त्यांच्या पीएला भेटलो, पण मी मुख्यमंत्र्यांकडे जाईपर्यंत माझी दखल घेतली नाही. मी कोणतीही सीमा ओलांडली नाही. स्थानिक आणि लोकप्रतिनिधींना विचार न घेता हा निर्णय घेण्यात आला, असं शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी सांगितलं.

(Jitendra Awhad ignore me then Complaints Cm Uddhav thackeray Says MLA Ajay Chaudhary)