Special Report | आर्यनच्या जामिनाची प्रत आर्थर रोड जेलमध्ये वेळेत का आली नाही?

Special Report | आर्यनच्या जामिनाची प्रत आर्थर रोड जेलमध्ये वेळेत का आली नाही?

| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 9:03 PM

जामीन मिळाल्यानंतरही आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सूटका होऊ शकलेली नाही. जामीन अर्जाची प्रत दुपारी कोर्टाकडून देण्यात आली. मात्र संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीन अर्जाची प्रत जेलपर्यंत पोहोचली नाही.

जामीन मिळाल्यानंतरही आर्यन खानची आर्थर रोड जेलमधून सूटका होऊ शकलेली नाही. जामीन अर्जाची प्रत दुपारी कोर्टाकडून देण्यात आली. मात्र संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीन अर्जाची प्रत जेलपर्यंत पोहोचली नाही. आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात आज संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला.