Yoshomati Thakur | Justice Delay is Justice Denied, न्यायपालिकेच्या धोरणावर यशोमती ठाकूर नाराज

| Updated on: Aug 24, 2022 | 3:24 PM

Yoshomati Thakur | काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली.

Follow us on

Yoshomati Thakur | काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर (Yoshomati Thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली. Justice Delay is Justice Denied, असा चिमटा ही त्यांनी यावेळी काढला. शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) ज्या प्रकारे फोडण्यात आले. त्यानंतर आघाडीचे सरकार पाडण्यात आले. त्यामुळे त्यावेळचे सत्ताधारी आणि सध्याचे विरोधक या सरकारविरोधात आवाज उठवत असतील तर चुकले कुठे असा सवाल त्यांनी केला. विरोधकांनी सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर रान पेटवले आहे. हे सरकार आर्थिक मलिदा लाटण्यासाठी एकत्र आल्याचा आरोप विरोधक करत असल्याने आज यावरुन विरोधक आणि सत्तादारी गटात तीव्र मतभेद समोर आले. धक्काबुक्की ही झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरणं होतं. यशोमती ठाकूर यांनी सरकारला विरोधकांची ही टीका संयमाने घ्यायला हवी असे वक्तव्य केले आहे.