Jyoti Malhotra : मोलकरणीला फळं आणायला सांगा, घराची काळजी घ्या; ज्योती मल्होत्राने घरच्यांना लिहिलं पत्र

Jyoti Malhotra : मोलकरणीला फळं आणायला सांगा, घराची काळजी घ्या; ज्योती मल्होत्राने घरच्यांना लिहिलं पत्र

| Updated on: May 20, 2025 | 2:40 PM

Jyoti Malhotra espionage case : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने अटक झाल्यानंतर घरच्यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र आता समोर आलेलं आहे. तसंच ज्योतीच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून देखील मोठे खुलासे झालेले आहेत.

ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्स अॅप चॅटमधून धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत. ज्योती मार्फत रॉ एजेंट्सपर्यंत पोहोचण्याचं आयएसआयचं उद्दिष्ट होतं. अटारी सीमेवर काही गुप्तहेर सापडले का? असा सवाल ज्योतीच्या चॅटमध्ये दिसून आलेला आहे. पाकिस्तानमधील अली हसन याने ज्योतीला कोड वर्डसद्वारे रॉ एजेंट्सबाबत विचारलेलं आहे. या कोड वर्डसच्या माध्यमातून अली हसन याने ज्योतीला विचारलं आहे की, ज्यावेळी ती अटारी सीमेवर गेली त्यावेळी तिला त्याठिकाणी असा कोणताही गुप्त व्यक्ती भेटला का? ज्याला ज्योतीला कुठेही प्रवेश कुठे मिळवून द्यायचा याचा प्रोटोकॉल मिळाला होता. ही सगळी माहिती ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिच्या घरी नेलं होतं. रविवारी रात्री पोलिसांनी ज्योतीला तिच्या हीसारमधील घरी नेलं होतं. घरी नेल्यावर ज्योती मल्होत्राने कुटुंबियांसाठी पत्र लिहिलं. घराची काळजी घ्या, मी लवकरच परत येईन, असा उल्लेख पत्रात आहे. मोलकरणीला फळं घरी आणायला सांगा, घराची काळजी घ्या, असंही उल्लेख ज्योतीने या पत्रात केलेला आहे.

Published on: May 20, 2025 02:40 PM