Kabul Airport | काबूल विमानतळावर स्फोट, 13 जणांचा मृत्यू

| Updated on: Aug 26, 2021 | 9:21 PM

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Follow us on

अफगाणिस्तान देश दोन बॉम्बस्फोटच्या घटनांनी हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर हे दोन स्फोट झाले आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक नागरीक यामध्ये जखमी झाल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.