गोकुळ झाला कसं पकडलं? मनसे पदाधिकारी दीपक आणि योगेशने सांगितला थरार
मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आरोपीचा शोध घेत असतानाच हा आरोपी कसा सापडला याचा थरार मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितला.
कल्याण पूर्व मधील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण झाल्याची घटना काल घडली. त्यानंतर पोलिसांकडून मारहाण करणाऱ्या या परप्रांतीय आरोपीचा शोध सुरू होता. मात्र पोलिसांच्या आधी या गोकुळ झा नामक आरोपीचा शोध मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर मनसे कार्यकर्ते आणि मनसे नेते अविनाश जाधव हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन तिला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते या गोकुळ झाचा शोध घेत होते. मात्र हा आरोपी मनसे कार्यकर्त्यांना कसा आणि कुठे सापडला याचा थरारक अनुभव स्वत: या मनसे कार्यकर्ते मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे आणि दीपक यांनी टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितला आहे.
Published on: Jul 23, 2025 10:30 AM
