कल्याण मारहाण प्रकरणी गोकुळ झाला ठोकल्या बेड्या

कल्याण मारहाण प्रकरणी गोकुळ झाला ठोकल्या बेड्या

| Updated on: Jul 23, 2025 | 9:20 AM

कल्याणच्या मराठी तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा याला पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयात मराठी तरुणीला परप्रांतीय व्यक्तीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्य आरोपी गोकुळ झा याने या तरुणीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर फरफटत नेले, ज्यामुळे तिच्या मानेला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. मानपाडा पोलिसांनी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांना नांदिवली भागातून अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आज दुपारी 11 ते 12 वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले जाणार आहे. गोकुळ झाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिस त्याच्या सखोल चौकशीसाठी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इतर संशयित नातेवाइकांचीही चौकशी करून त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

Published on: Jul 23, 2025 09:19 AM