Kalyan :  धारदार हत्यारानं वार अन्… कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झाचा आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

Kalyan : धारदार हत्यारानं वार अन्… कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झाचा आणखी एक धक्कादायक VIDEO समोर

| Updated on: Jul 23, 2025 | 2:12 PM

कल्याणमध्ये घडलेल्या एका घटनेनंतर कल्याणात मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे आरोपीचा पाय चांगलाच खोलात जाण्याची शक्यता आहे.

कल्याणमधील मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. तरूणीला मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झाचा आणखी एक व्हिडीओ समोर आल्याने त्याचे एक एक कारनामे उघड होत आहे. हत्याराने वार करताना पहिल्या गुन्ह्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पुढील सुनावणी असेल त्यावेळी कोर्टापुढे सादर केला जाणार आहे. त्यामुळे आरोपी गोकुळ झाच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार असल्याचे या व्हिडीओवरून समोर आले आहे.

कल्याणच्या नांदिवली येथील एका खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला याच आरोपीने बेदम मारहाण झाल्याची घटना नुकतीच सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काल मंगळवारी गोपाल झा या नावाच्या व्यक्तीने रिसेप्शनिस्टला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेल्या झा यांना तरुणीने नंबर आल्यानंतर आत येण्यास सांगितले होते. यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. ही घटना गंभीर असून पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Published on: Jul 23, 2025 02:07 PM