Kalyan : मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीला केस धरून लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण करणारा ‘तो’ व्यक्ती कोण? वादावादीचं कारण काय?
कल्याणच्या नांदिवलीमध्ये एका खाजगी रुग्णालयाच्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये एका खाजगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण झाली. एका परप्रांतीय तरुणाने हॉस्पिटलमधल्या मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून गोपाल झा नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायचं होतं पण डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये काही एमआर बसेले होते. त्यामुळे तरुणींना गोपाल झा याला काही वेळ थांबण्यास सांगितलं त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोपाल झा यांची वादावादी झाली. त्यानंतर गोपाल झा यांनी बाहेरून धावत येत तरुणीला जोरदार लाथ मारली. यामुळे ती तरुणी खाली कोसळली त्यानंतर गोपाल झा यांनी तरुणीच्या केसांना धरून तिला ओढत नेलं. गोपाल झा याने तरुणीला बेदम मारहाण केली.
ज्या मुलीला मारहाण केली तिने टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ती म्हणाली, त्या व्यक्तीने मला शिव्या दिल्या. मी फक्त त्याला बोलली की सर तुमचा नंबर यायला वेळ आहे. नंबर आला तर मी तुम्हाला आतमध्ये पाठवते. यात माझी काय चुकी आहे. असे सांगितल्यावर त्याने शिव्या दिल्या. एवढंच नाहीतर मला बेदम मारलं. माझे केस ओढून बाहेर दरवाज्यापर्यंत नेलं परत मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलं.
