Kalyan KC Gandhi School : धागा नको, टिकली नको, कल्याणच्या शाळेतील अजब फतव्याचं लॉजिक समोर, मुख्याध्यापकांनी कारण सांगितलं!
कल्याणमधील कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास आणि हातात धागा बांधण्यास बंदी घातल्याचा फतवा जारी केला आहे. संतप्त पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यानंतर शाळेतून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे.
कल्याण शहरातील एक इंग्रजी माध्यमाची शाळा सध्या चांगलीच चर्चेत आहे. या शाळेचं नाव कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूल असं असून या शाळेने विद्यार्थ्यांच्या कपाळाला टिळा लावण्यास तसेच हातात धागा बांधण्यास बंदी घातल्याचा एक अजब फतवा जारी केल्याची माहिती समोर येत आहे. या शाळेच्या नियमानुसार, विद्यार्थिनींना डोक्याला टिकली लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. शाळेच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षण विभागाकडे या संदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. पालकांच्या आरोपानुसार, काही विद्यार्थ्यांच्या कपाळावरील टिळा शाळेतील कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने पुसून टाकला आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत कल्याण पालिकेने कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला नोटीस बजावली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, अशा प्रकारचे बंधन देशाच्या संस्कृतीवर घालणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. विभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर आता मुख्यध्यापकांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे.
