..तर भोकं पडतील का? मराठी भाषेबद्दल केतकी चितळेचं वादग्रस्त विधान

..तर भोकं पडतील का? मराठी भाषेबद्दल केतकी चितळेचं वादग्रस्त विधान

| Updated on: Jul 25, 2025 | 9:07 AM

मराठी-हिंदी भाषा वाद पेटला असतानाच अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान करत या वादात नवे वळण आणले आहे.

सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी बोलावेच लागेल, अशी भूमिका मनसे, ठाकरे गट आणि इतर काही पक्षांनी घेतली आहे. राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयामुळेही हा भाषावाद तीव्र झाला होता. मीरा भाईंदर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर मराठी-हिंदी वाद आणखी चिघळला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त विधान करत या वादात नवे वळण आणले आहे. “मराठी न बोलल्याने भोकं पडतील का?” असा थेट सवाल तिने उपस्थित केला आहे. तिच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाची शक्यता व्यक्त होत आहे.

केतकी चितळे म्हणाल्या, “लोक या वादातून आपली असुरक्षितता दर्शवत आहेत. ‘फक्त मराठीत बोल’ किंवा ‘तुला मराठी कसं येत नाही’ असा दबाव टाकला जात आहे. समोरची व्यक्ती मराठी बोलेल की नाही, याने मराठी भाषेचे नुकसान होणार आहे का? मराठी न बोलल्याने कोणाला भोकं पडणार आहेत का? अशा दबावातून तुम्ही फक्त स्वतःची असुरक्षितता दाखवत आहात. यामुळे कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही,” असे तिने स्पष्टपणे सांगितले.

Published on: Jul 25, 2025 09:06 AM