Nawab Malik | विधानसभेत मी मोठा गौप्यस्फोट करणार : नवाब मलिक

Nawab Malik | विधानसभेत मी मोठा गौप्यस्फोट करणार : नवाब मलिक

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 6:02 PM

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर टीका केली असून मलिकांनीही प्रतित्त्यूर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि किरीट सोमय्या यांनी एकमेंकावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. मलिक  यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे. दाऊदला विमानात कोणी बसवलं? त्याच्यासोबत कोण होतं? असा सवालच किरीट सोमय्या यांनी केला. तर दुसरीकडे मलिकांनी मी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगत त्यानंतर एकही भाजपचा नेता जनतेसमोर जाऊ शकणार नाही असंही म्हटलं आहे.