Kishori Pednekar | पुण्याला कोणी सावत्र वागणूक देत नाही : किशोरी पेडणेकर
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय.
राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरात सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारनं पुण्यातील निर्बंध जैसे थेच ठेवले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. पुण्यात सरकारनं असा निर्णय का घेतला कळत नाही. कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही फडणवीस यांनी पुणेकरांना दिलाय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरुनही अमृता फडणवीस यांनी टोला लगावलाय. त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय.
