Vantara : वनतारामध्ये ‘माधुरी’ सध्या काय करते? हायड्रोथेरपी अन् बरंच काही… बघा अशी घेतली जाते काळजी

Vantara : वनतारामध्ये ‘माधुरी’ सध्या काय करते? हायड्रोथेरपी अन् बरंच काही… बघा अशी घेतली जाते काळजी

| Updated on: Aug 07, 2025 | 2:03 PM

माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरू असताना, वनताराने तिच्या देखभालीसाठी आणि तिच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. बघा माधुरी सध्या काय करते?

माधुरी हत्तीण कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातल्या एका मठात १९९२ पासून राहत होती. तिला ‘वनतारा’ नावाच्या प्राणी संवर्धन केंद्रात हलवल्यामुळे हे प्रकरण राज्यभरात चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. माधुरीला ‘वनतारा’ मध्ये हलवण्याच्या निर्णयाला नांदणीच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. आता महाराष्ट्र सरकार माधुरीला पुन्हा कोल्हापूरला आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने या संदर्भात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वनतारा’ केंद्रानेही यावर सकारात्मक भूमिका घेतली असून माधुरीला परत पाठवण्यास ते तयार आहेत. मात्र माधुरी सध्या वनतारामध्ये काय करते? तिची काळजी कशी घेतली जाते?

माधुरीच्या पायांच्या जखमांवर औषधोपचार आणि हायड्रोथेरपी सुरू आहे. तिच्या जुन्या सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तिला मोठ्या तलावात पाठवण्यात येते. तिच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात घेऊन तिच्यासाठी एक खास आहार योजना तयार करण्यात आली आहे. माधुरीला साखळदंडांशिवाय मोकळ्या जागेत फिरते. तिच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी रात्रीच्या निवासाची योग्य सोय आहे, ज्यात रबराइज्ड फ्लोअरिंग आणि मऊ वाळूची जागा आहे. तर तिच्या उपचारांसाठी लेझर थेरपी आणि एक्स-रे व अल्ट्रासाउंड सारख्या सुविधा असलेले ऑन-साइट पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध आहे.

Published on: Aug 07, 2025 11:23 AM