KOLHAPUR- ‘सत्तेसाठी लाचारी पत्करली, बाळासाहेबांना दु:ख होत असेल’, दरेकरांचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Apr 08, 2022 | 11:26 AM

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांची भूमिका काय यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलीतरी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी कडवट शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत.

Follow us on

कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांची भूमिका काय यावरून तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिवसेना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलीतरी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणार का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी कडवट शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत. 70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रचार सभेनंतर एका शिवसैनिकाने त्यांची भेट घेतली. शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. हे पाहून बाळासाहेबांनाही दुःख होत असेल, असं सांगत सगळ्या शिवसैनिकांना भाजपला मतदान करायला सांगा. तुमची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असं आवाहन प्रवीण दरेकरांनी शिवसैनिकांना केलं आहे.