IMD Weather Update : पुढचे चार दिवस धोक्याचे… ‘या’ भागात वादळी वाऱ्यांसह परतीचा पाऊस झोडपणार, हवामान खात्याचा इशारा काय?
बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे कोकण आणि गोव्यात 25 ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. अरबी समुद्रातही प्रभाव जाणवत असून, वेगवान वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुपारपर्यंत ऊन आणि दुपारनंतर पाऊस, असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे कृषी विभागाचे आवाहन आहे.
कोकण आणि गोव्यात पुढील चार दिवस परतीचा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने हा बदल दिसून येत आहे, ज्याचा परिणाम अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरही जाणवत आहे. कालपासूनच रायगडपासून तळ कोकणापर्यंत मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरात कोकणाला दोनदा परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. सध्या अरबी समुद्र खवळलेला असून, किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहेत. 25 ऑक्टोबरपर्यंत दुपारनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज आहे. दुपारपर्यंत कडक ऊन आणि दुपारनंतर पाऊस, असा दुहेरी निसर्गाचा खेळ सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे भात कापणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
